नुकत्याच जपानमध्ये पार पडलेल्या पाचव्या 'आशियाई पॅरा गेम्स (Asian Para Games)' २०२६ मध्ये चीन पदकतालिकेत अव्वल तर भारत ११४ पदकांसह चौथ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.

ठळक मुद्दे:

  • 'आयची-नागोया (Aichi–Nagoya) २०२६' म्हणून अधिकृतपणे ओळखले जाणारे पाचवे आशियाई पॅरा गेम्स २०२६ जपानमधील आयची प्रीफेक्चर आणि नागोया येथे पार पडले आहेत.
  • त्यांचे आयोजन १८ ते २४ ऑक्टोबर २०२६ दरम्यान करण्यात आले होते.
  • सदर स्पर्धेत भारताने ३० सुवर्ण, ३५ रौप्य आणि ४९ कांस्य अशी एकूण ११४ पदके जिंकून पदकतालिकेत चौथे स्थान पटकावले आहे.

पदकप्राप्त अव्वल देशांची क्रमवारी:

  • १. चीन - ४३५ पदके (२०७ सुवर्ण, ११७ रौप्य, १११ कांस्य)
  • २. जपान - १८६ पदके (६४ सुवर्ण, ६० रौप्य, ६२ कांस्य)
  • ३. उझबेकिस्तान - १४५ पदके (४५ सुवर्ण, ४९ रौप्य, ५१ कांस्य)
  • ४. भारत - ११४ पदके (३० सुवर्ण, ३५ रौप्य आणि ४९ कांस्य)

आशियाई पॅरा गेम्स २०२६ बाबत महत्वपूर्ण माहिती:

स्पर्धेचे आयोजक:

  • यजमान देशाच्या आयोजन समितीच्या समन्वयाने 'आशियाई पॅरालिम्पिक कमिटी (Asian Paralympic Committee)' आशियाई पॅरा गेम्सचे आयोजन करते.

शुभंकर (Mascot):

  • 'उझुमिन' (Uzumin) = 'उझु' (भंवर/whirlpool) + 'इझुमी' (झरा/spring)
  • हा शुभांकर म्हणजे आयची-नागोया येथे एकत्र येण्याचा खेळाडूंचा उत्साह तसेच त्यातून निर्माण होणाऱ्या भावना संपूर्ण आशिया खंडात पसरण्याचे प्रतीक आहे.

स्पर्धेचे घोषवाक्य (Motto):

  • बोधचिन्हासोबतच 'इमॅजिन वन हार्ट' (Imagine One Heart - एक हृदय कल्पिणे) हे या स्पर्धेचे घोषवाक्य जाहीर करण्यात आले आहे.

भारतीय पथक:

  • भारताच्या एकूण १६८ खेळाडूंनी (११२ पुरुष आणि ५६ महिला) ११ क्रीडा प्रकारांत सहभाग घेतला होता.

भारताची उल्लेखनीय कामगिरी:

  • सदर स्पर्धेत भारताने आपली आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे.
  • २०२३ मध्ये हांगझू, चीन आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताने १०८ पदके (२७ सुवर्ण, ३२ रौप्य आणि ४९ कांस्य) जिंकून ६ वे स्थान मिळवले होते.

ध्वज हस्तांतरण सोहळा: 

  • अधिकृतपणे सहाव्या आशियाई पॅरा गेम्स २०३० चे यजमान शहर असणाऱ्या दोहा, कतारकडे आशियाई पॅरालिम्पिक कमिटीचा ध्वज सोपवण्यात आला  आहे.